१० वर्षात ६ हजार कोटी खर्च करूनही मुंबई -गोवा महामार्गाचे काम रखडले
मुंबई-गोवा महामार्ग प्रकल्पावरील खर्चाची महत्त्वपूर्ण महिती माहितीच्या अधिकारातून उघड झाली आहे. ज्यामुळे महाराष्ट्राच्या सार्वजनिक बांधकाम विभागाच्या कार्यक्षमतेवर आणि पारदर्शकतेवर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे. आरटीआय कार्यकर्ते जितेंद्र घाडगे यांनी यासंबंधी माहिती मिळवली आहे. मुंबई-गोवा महामार्गावर 10 वर्षात ६००० कोटी खर्च करण्यात आले आहेत.केंद्र सरकार आणि महाराष्ट्र पीडब्ल्यूडी या दोघांकडून आरटीआय कायद्यांतर्गत मिळालेल्या माहितीनुसार, नवीन चौपदरी महामार्गासाठी…
