२७ वर्षांची लढाई अखेर संपली – लोकसभेत महिला आरक्षण विधेयक ४५४ मतांनी मंजूर
नवी दिल्ली : लोकसभेत महिला आरक्षणाच्या विधेयकावर चर्चा झाल्यानंतर हे विधेयक मंजूर झाले आहे. विधेयकाच्या बाजूने ४५४ तर विरोधात फक्त दोन सदस्यांनी मतदान केले. महिला आरक्षण विधेयक हे घटनादुरुस्ती विधेयक आहे. महिला आरक्षण विधेयक आता राज्यसभेत सादर करण्यात येणार आहे. राज्यसभेच्या मंजुरीनंतर महिला आरक्षण विधेयक राष्ट्रपतींकडे मंजुरीसाठी पाठवण्यात येईल. त्यानंतर घटनादुरुस्ती होईल.महिला आरक्षण कायद्याची १९९६…
