मुंबई दक्षिण लोकसभा मतदारसंघातून अरविंद सावंत विजयी तर दक्षिण मध्य लोकसभा मतदारसंघातून अनिल देसाई विजयी
मुंबई, दि. ४ : लोकसभेच्या सार्वत्रिक निवडणुकीत ३१-मुंबई दक्षिण लोकसभा मतदारसंघातून शिवसेना -उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे अरविंद सावंत विजयी झाले आहेत.त्यांनी शिवसेनेच्या यामिनी जाधव यांचा पराभव केला. अरविंद सावंत यांना ३,९५,६५५ एवढी मते मिळाली तर यामिनी जाधव यांना ३,४२,९८२ एवढी मते मिळाली. या लोकसभा मतदारसंघाची मतमोजणी मुंबईतील शिवडी येथील वेअर हाऊस, गाडी अड्डा येथे झाली….
