गिरगाव, वरळी, दादर चौपाटीवरील गणेश विसर्जन व्यवस्थापनाचे कौतुक; मात्र कंत्राट पद्धतीवरून अधिकाऱ्यांच्या कार्यपद्धतीवर रोष
मुंबई: बृहन्मुंबई महानगरपालिकेच्या वतीने स्वराज्यभूमी गिरगाव चौपाटी, शिवाजी पार्क दादर चौपाटी, वरळी कोळीवाडा चौपाटी येथे गणेशमूर्ती विसर्जनासाठी करण्यात आलेल्या नियोजनाची देशभरातील १३ वरिष्ठ महसुली अधिकारी आणि तज्ज्ञांच्या अभ्यास पथकाने पाहणी केली. भारतीय व्यवस्थापन संस्था (आयआयएम) मुंबईच्या ‘सार्वजनिक धोरण व्यवस्थापन कार्यक्रमा’ अंतर्गत हा दौरा आयोजित करण्यात आला होता. गर्दी व्यवस्थापन, नागरी सुविधा, सुरक्षा आणि विविध यंत्रणांमधील…
