बाईक टॅक्सींविरोधात राज्यभरात रिक्षा-टॅक्सी चालकांचा एल्गार; २३ नोव्हेंबरला प्रतिकात्मक आंदोलन
मुंबई: राज्यात बेकायदेशीररीत्या सुरू असलेल्या बाईक टॅक्सी सेवांविरोधात महाराष्ट्रातील ऑटो रिक्षा आणि टॅक्सी संघटना आक्रमक झाल्या आहेत. या सेवांवर बंदी घालण्याच्या मागणीसाठी २३ नोव्हेंबर रोजी राज्यव्यापी प्रतिकात्मक आंदोलन पुकारण्यात आले आहे. मुंबईसह राज्यातील प्रमुख शहरांमधील रिक्षा-टॅक्सी संघटना या आंदोलनात मोठ्या संख्येने सहभागी होणार आहेत. रॅपिडोसारख्या कंपन्यांकडून आवश्यक शासकीय परवान्यांशिवाय बाईक टॅक्सी चालवल्या जात असून, यामुळे…
