मुंबई महापालिकेत भ्रष्टाचाराला उधाण ! २० हजारांची लाच घेताना एसीबीने उपअभियंत्याला ठोकल्या बेड्या ठोकल्या
नागरिकांच्या समस्या सोडवण्यासाठी आणि त्यांना सुविधा पुरवण्यासाठी नेमण्यात आलेले अधिकारीच आता पैशांच्या मोहात अडकल्याचे भीषण वास्तव समोर आले आहे. सर्वसामान्यांची कामे वेळेवर आणि विनाअडथळा व्हावीत, अशी अपेक्षा असताना, एका अधिकाऱ्याने चक्क स्वतःच्याच खिशात पैसे घालण्याचा प्रयत्न केला आहे. या प्रकरणाची गंभीर दखल घेत लाचलुचपत प्रतिबंधक विभाग अर्थात ACB च्या पथकाने धडक कारवाई केली असून, २०…
