Author: Mumbai Jansatta

  • आता अनन्या पांडेच्या घरी जाऊन एनसीबीची छापेमारी

    एनसीबीच्या एका पथकानं सकाळीच अनन्याच्या घरी जाऊन छापेमारी केली होती. अनन्याच्या घरातून काही मोबाईल, लॅपटॉप आणि इलेक्ट्रॉनिक डिवाईस जप्त केल्याची माहिती एनसीबीतील सूत्रांच्या हवाल्यानं मिळते आहे. क्रूझ ड्रग्ज पार्टीप्रकरणी चौकशीसाठी समन्स पाठवल्यानंतर अभिनेत्री अनन्या पांडे एनसीबी कार्यालयात दाखल झाली आहे. अनन्यासोबत तीचे वडील चंकी पांडेही एनसीबी कार्यालयात पोहोचले आहेत

  • | |

    … तर महापालिका निवडणुकीच्या तोंडावरच शिवसेनेत फूट अटळ

    मुंबई (किसनराव जाधव) राजकारणात कुणीही कुणाचा कायमचा मित्र किंवा कायमचा शत्रू नसतो त्यामुळे स्वतःच्या राजकीय फायद्यासाठी कोण कधी कोणाशी सोयरिक करील याचा नेम नाही.एक काळ असा होता की शिवसेनेत मोठ्या प्रमाणावर कडवे आणि निष्ठावान शिवसैनिकांची फौज होती पण सध्याचं चित्र वेगळे आहे . जिथे राज ठाकरे यांच्या सारखी रक्ताच्याचात्याची माणसे शिवसेना सोडू शकतात तिथे इतरांचे…

  • भिवंडीत मैत्रिणी सोबत कारमधून जाणाऱ्या तरुणावर जीवघेणा हल्ला करून लुटणारे लुटारू गजाआड..

    भिवंडी दि २० मैत्रिणी सोबत कार मधून जाणाऱ्या तरुणावर अचानक जीवघेणा हल्ला करून  त्याच्या व मैत्रणीकडील मोबाईल व सोन्याचे दागिने  घेऊन फरार झालेल्या चोरट्यांना कोनगाव पोलिसांनी मुसक्या आवळल्या आहेत. अब्दुल कादिर अबरार शेख (वय २४ वर्षे, रा. मोईवाडा, कल्याण,प) , उमर अब्दुल रहेमान मन्सुरी ( वय २४ वर्षे, रा. गोविंदवाडी, कल्याण, प), निहाल नजीर शेख (वय २३ वर्ष रा, गोविंदवाडी, कल्याण,प) अशी अटक केलेल्या लुटारूंची नावे आहेत. तर या चोरट्यांकडून चोरीचा मुद्देमाल घेणाऱ्या दोघांनाही अटक केली आहे. आकाश राजेश कंडारे (वय २४ वर्षे),सलमान उर्फ नजीब मस्जीद शेख (वय २७ वर्ष)  असे चोरीचा मुद्देमाल विकत घेणाऱ्या अटक आरोपींचे नावे आहेत.  कार समोर दुचाकी आडवी लावून लुटमारी .. ठाणे शहरातील पाचपाखाडी भागात राहणारे दर्शिल हितेश गुढ़का वय २७ वर्ष ) हे त्यांच्या मैत्रिणीसोबत १२ आक्टोंबरच्या मध्यरात्री मारुती  रिटस कारने  भिवडी  पाईपलाईन रोडने डोगराळीकडुन घरी ठाणे येथे जात होते. त्यावेळी अचानक रेल्वे पुलाखाली अनोळखी तिन जणांनी त्याच्या कार समोरच दुचाकी आडवी  लावून उभी केली. विचारपूस करण्यासाठी  दर्शिल कार मधून बाहेर पडताच  तिघा  चोरटयांनी  त्याचा  मोबाईल हिसकावला तसेच  मैत्रीणकडीलही  मोबाईल, तिच्या गळ्यातील सोन्याची चेन व  हातातील सोन्याची अंगठी असा एकूण ८३ हजार रुपयांचा  मुद्देमाल जबरीने  काढून घेतला.  त्यावेळी दर्शिलने  चोरट्यासोबत  प्रतिकार केला असता त्याच्या डोक्यात लाकडी दांडक्याने जोरदार प्रहार करून  मुद्देमाल घेऊन घटनस्थळावरून फरार झाले. तर  चोरट्यांच्या  हल्ल्यात दर्शिल याला गंभीर दुखापत झाल्याने त्याच्यावर ठाण्यातील एका खाजगी रुग्णालयात उपचारासाठी दाखल केले. याप्रकरणी कोनगाव पोलीस ठाण्यात विविध भादवि कलमानुसार  गुन्हा दाखल  केला. मात्र याघटनेमुळे परिसरातील नागरिकांमध्ये भितीचे वातारवण  निर्माण झाले.   तीन पोलीस पथकाने शोध घेऊन आरोपीसह मुद्देमाल केला हस्तगत .. चोरटयांनी गुन्हा करताना निर्जनस्थळ व रात्रीच्या अंधाराचा फायदा घेऊन केला होता. त्यामुळे पोलिसांकडे हा गुन्हा उघडकीस आणण्यासाठी कुठलाही सुगावा नसल्याने पोलिसांसोर  मोठ आव्हान होते. या  गुन्हयातील आरोपींचा शोध घेण्यासाठी तीन पोलीस पथके नेमली होती. त्यांनतर पोलीस  तपासात व गुप्त बातमीदारामार्फत तसेच तांत्रिक तपासाच्या आधारे  गुन्हयातील अब्दुल कादिर अबरार शेख,  उमर अब्दुल रहेमान मन्सुरी, निहाल नजीर शेख, यांना कल्याणमधून ताब्यात घेऊन त्यांच्याकडे चौकशी केली असता, तिघांनाही गुन्हा केल्याचे कुबल केले. मात्र लुटमारीतील मुद्देमाल इतर दोघांना विक्री केल्याने मुद्देमाला हस्तगत करण्यासाठी पोलिसांनी सापळा रचून  आकाश राजेश कंडारे, आणि  सलमान उर्फ नजीब मस्जीद शेख दोघांनाही अटक करून त्यांच्याकडून चोरीचा विकत घेतलेला मुद्देमाल जप्त केला. तसेच गुन्ह्यात वापरलेली दुचाकीही जप्त केली आहे.  पाचही आरोपी सराईत गुन्हेगार ..  गुन्हयाच्या प्रकरणी  अटक केलेल्या पाचही आरोपींचा कोनगाव पोलिसांनी अधिक तपास केला असता, आरोपी हे रेकॉर्डवरील सराईत गुन्हेगार असल्याचे तपासात समोर आले. आरोपी अब्दुल कादिर अवरार शेख ३ गंभीर गुन्हे,   उमर अब्दुल रहेमान मन्सुरी ३ गुन्हे ,  निहाल नजीर शेख १४ गुन्हे आणि चोरीचा मुद्देमाला विकत घेणाऱ्या आकाश याच्यावर तब्बल  १४  गंभीर स्वरूपाचे गुन्हे दाखल असल्याची माहिती पोलीस उपआयुक्त योगेश चव्हाण यांनी दिली. तर हा गुन्हा उघडकीस  सपोनि किरणकुमार वाघ आणि  गुहे प्रकटीकरण पथकातील पोलीस उपनिरीक्षक पराग भाट यांच्यासह पथकाने कामगीरी बजावली आहे. 

  • पवार आणि मुख्यमंत्र्यांची पुन्हा तातडीची भेट

    मुंबई/ राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांनी गेल्या दोन दिवसात दुसऱ्यांदा मुख्यमंत्री ठाकरे यांची भेट घेतली या भेटीत केंद्र सरकार कडून तपास यंत्रणांच्या होत असलेल्या गैर वापराबाबत चर्चा झाल्याचे समजते केंद्राकडून ई डी ,सीबीआय सारख्या यंत्रणांचा महा विकास आघाडीच्या नेत्यांच्या विरोधात गैर वापर केला जात आहे त्याला कसे तोंड द्यायचे याबाबत दोन्ही नेत्यांमध्ये पुढे काय करायचे…

  • |

    रुग्णसंख्या कमी झाल्यास दिवाळी नंतर सर्वांसाठी लोकल सुरू करणार

    मुंबई/ करोना आता हळू हळू आटोक्यात येत आहे त्यामुळे लसीचे दोन डोस घेतलेल्यांना लोकल प्रवासाची मुभा देण्यात आली आहे .मात्र तो आणखी आटोक्यात आला तर दिवाळी नंतर सर्वांसाठी लोकल ट्रेन च्या प्रवासास मुभा दिली जाईल असे आरोग्य मंत्री राजेश टोपे यांनी सांगितलेमार्च २०२० मध्ये लॉक डाऊन सुरू झाल्यापासून लोकल ट्रेन बंद होती मात्र काही महिन्यांनी…

  • अखेर दीड वर्षांनी राज्य महिला आयोगाला अध्यक्ष रुपाली चाकनकर नव्या अध्यक्षा

    मुंबई/ महाराष्ट्रात महिलांवरील अत्याचाराच्या घटना दिवसेंदिवस वाढत असताना राज्य महिला आयोगाचे अध्यक्षपद गेल्या दीड वर्षापासून रिकामे होते अखेर राष्ट्रवादी चां प्रदेशाध्यक्षा रुपाली चाकण कर यांची महिला आयोगाच्या अध्यक्षपदी नियुक्ती करण्यात आली आहेआघाडी सरकारच्या काळात बराच काळ महिला आयोगाला अध्यक्ष नव्हता .त्यानतर फडणवीस सरकारचां काळात औरंगाबादचां माजी महापौर विजया रहाटकर यांची राज्य महिला आयोगाच्या अध्यक्ष पदी…

  • राज्यात बलात्कारांच्या घटना सुरूच दोन शेतमजूर महिलांवर बलात्कार

    मुंबई/ राज्यात बलात्काराच्या घटना मध्ये दिवसेंदिवस वाड होत चालली असून काल पैठण तालुक्यातील तोंडूली गावात दोन महिलांवर सात दरोडे खोरानी सामूहिक बलात्कार केला त्यातील एक महिला गर्भ वती होती तर एक पंधरा दिवसा पूर्वीच बाळंत झाली होती या घटनेमुळे संपूर्ण महाराष्ट्रात खळबळ माजली आहेऔरंगाबाद जिल्ह्यातील पैठण तालुक्यात असलेल्या तोंडली गावात शेतातील वस्तीवर काही शेतमजूर महिला…

  • | |

    मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचे मुंबई महानगरपालिकेस स्पष्ट निर्देश -कोणाच्याही दबावात न येता अनधिकृत बांधकामे रोखा- तातडीने युद्ध पातळीवर कारवाई करा

    वॉर्डनिहाय पथके नेमून डेब्रीज टाकण्याचे प्रकार रोखामुंबई हे देशातले सुंदर, स्वच्छ बनविण्यासाठी मैदानात उतरा मुंबई दि २०: अनधिकृत बांधकामांवर मुंबई पालिकेने युद्ध पातळीवर तातडीने कारवाई करावी, यामध्ये कोणाचाही दबाव सहन करू नका, आम्ही तुमच्या पाठीशी आहोत अशा स्पष्ट शब्दांत मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी आज मुंबई महानगरपालिकेच्या बैठकीत सूचना दिल्या. पूर्व आणि पश्चिम महामार्गालगत देखील मोठ्या…

  • |

    अभिनेता शाहरुख खानचा मुलगा आर्यन खानचा जामीन अर्ज फेटाळण्यात आला

    मुंबई : अभिनेता शाहरुख खानचा मुलगा आर्यन खानचा जामीन अर्ज फेटाळण्यात आला आहे. त्यामुळे शाहरुखसह खान कुटुंबाला पुन्हा मोठा झटका बसला आहे. आर्यन खानसह अरबाज मर्चंट, मुनुमन धामेचा या तिघांचाही जामीन अर्ज मुंबईतील विशेष एनडीपीएस कोर्टाने फेटाळून लावला आहे. आर्यनची अधिक चौकशी करण्यासाठी एनसीबीने त्याची कोठडी मागितली आहे. आर्यनचा संपूर्ण कटात समावेश असल्याता आरोप एनसीबीने…

  • आता सहकार क्षेत्रातील घोटाळे बाजांची खैर नाही-

    मुंबई/महाराष्ट्राच्या ग्रामीण भागाचा आर्थिक कणा म्हणून ओळखल्या जाणाऱ्या सहकार क्षेत्रातील भ्रष्टाचाराचे समूळ उच्चाटन करण्यासाठी केंद्रीय सहकार मंत्री अमित शहा यांनी काल एक बैठक बोलावली होती या बैठकीच्या माध्यमातून अमित शहा यांनी महाराष्ट्रातील सहकार क्षेत्रात झालेल्या भ्रष्टाचाराची माहिती घ्यायला सर्वात केल्याने आता सहकार क्षेत्रातील लुटारूंनी खैर नाही असे मुंबईचे माजी उप महापौर आणि भाजप नेते बाबूभाई…