गुजराती नाम फलकाची पाटी तोडणाऱ्या विरोधात भाजपचे आंदोलन
मुंबई : मुंबईत गुजराती पाट्यांचा वाद आता चिघळण्याची शक्यता आहे. घाटकोपरमध्ये काही दिवसांपूर्वी गुजराती भाषेत असलेल्या ‘मारू गुजराती’ या पाटीची तोडफोड केली असल्याचा आरोप भाजपने केला आहे. तोडफोडीविरोधात भाजप आक्रमक झाली असून गुजराती पाटी असूच नये असा नियम आहे का, असा सवाल भाजपच्या पदाधिकाऱ्यांनी उपस्थित केला आहे.घाटकोपर पूर्वमधील आर बी मेहता मार्गावरील गुजराती नामफलक फोडल्याने…
