मुंबई बँकेच्या अध्यक्ष पदाची निवडणूक म्हणजे समझोता एक्सप्रेस
मुंबई/ राजकारणात कधी कधी काही मिळवण्यासाठी किंवा मिळवलेले टिकवण्यासाठी मनात नसतानाही तडजोडी कराव्या लागतात मुंबई बँकेच्या अध्यक्ष पदाच्या निवडणुकीत जे तडजोडीचे राजकारण बघायला मिळाले ते एका दिवसात घडलेले नव्हते. त्याची पटकथा फार पूर्वी लिहिलं गेली असावी त्यामुळं तू मारल्यासारखे कर मी रडल्यासारखे करतो म्हणजे दोघांचीही प्रतिष्ठा टिकून राहील अशा पद्धतीची व्यूहरचना या निवडणुकीत करण्यात आली…
