हनी ट्रॅप मध्ये अडकून पाकिस्तान साठी हेरगिरी करणाऱ्या डॉकयार्ड मधील अभियंत्याला अटक
ठाणे/पाकिस्तानी गुप्तहेर महिलेच्या हनी ट्रॅपचे आणखी एक खळबळजनक प्रकरण आता समोर आले आहे.यामध्ये भारतीय नौदलाची गोपनीय माहिती पुरविणाऱ्या मुंबई डॉकयार्डमधील अभियंता तंत्रज्ञ रविकुमार वर्मा (वय ३५, रा. कळवा, ठाणे) याला राज्याच्या दहशतवाद विरोधी पथक (एटीएस) कडून गुरुवारी अटक झाली आहे. त्याच्या संपर्कातील दोघांविरुद्ध शासकीय गुपिते अधिनियमाखाली (युएपीए) गुन्हा दाखल करण्यात आला आहे. गोपनीय माहिती पुरविल्यानंतर…
