राष्ट्रवादीच्या दोन गटांची निवडणूक आयोगाच्या दरबारात कायदेशीर लढाई सुरु
नवी दिल्ली – केंद्रीय निवडणूक आयोगात आज राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष कुणाचा? या मुद्द्यावरुन महत्त्वाची सुनावणी पार पडली. निवडणूक आयोगात राष्ट्रवादी पक्षाचं नाव आणि चिन्हावरची आजही पहिली सुनावणी होती. या सुनावणीत दोन्ही गटाकडून जोरदार युक्तिवाद करण्यात आला. या सुनावणीनंतर राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार हे त्यांचे वकील अभिषेक मनु सिंघवी यांच्यासोबत निवडणूक आयोगाच्या कार्यालयाच्या बाहेर पडले….
