बालवाडी शिक्षिका न्यायाच्या प्रतीक्षेत
मुंबई/बृहन्मुंबई महानगरपालिकेच्या अधिपत्याखाली येणाऱ्या बालवाड्यांमध्ये कार्यरत असलेल्या शेकडो शिक्षिका गेल्या काही वर्षांपासून अन्यायकारक परिस्थितीचा सामना करत आहेत. वय ५८ वर्षे झाल्याचे दाखवून अनेक जुन्या आणि अनुभवी शिक्षिकांना कामावरून रीतसर नोटीस न देता सेवा संपवली जात आहे. त्यांच्या जागी नव्या शिक्षिकांची भरती केली जात असून, दोघींनाही योग्य मानधन मिळत नाही.असा आरोप आयोजक रूपा रेडकर व स्वप्ना…
