इतिहास भारतातील करोना योद्ध्यांच्या कार्याची दखल घेईल : राज्यपाल भगतसिंह कोश्यारी
राज्यपालांच्या हस्ते ४४ डॉक्टर्स सन्मानित जगाच्या इतिहासात यापूर्वी ठराविक प्रदेश किंवा देशांपुरत्या महामारी येऊन गेल्या. परंतु करोनामुळे एकाच वेळी संपूर्ण जग बाधित झाले. या काळात भारतातील डॉक्टर्स, नर्सेस, वॉर्ड बॉईज यांसह सर्व आरोग्य सेवक करोना योद्ध्यांच्या केलेल्या अद्भुत कार्याची दखल इतिहास निश्चितपणे घेईल, असे प्रतिपादन राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी आज येथे केले. ‘परिश्रम’ या सामाजिक सेवाभावी संस्थेतर्फे करोना काळात…
