मुंबईत बाप्पाला भावपूर्ण निरोप; गिरगाव चौपाटीवर लोटला भाविकांचा अथांग सागर!
मुंबई:दहा दिवसांच्या उत्सवानंतर आज मुंबईत लाडक्या बाप्पाला अत्यंत जड अंतकरणाने आणि उत्साहात भावपूर्ण निरोप देण्यात आला. ‘गणपती बाप्पा मोरया, पुढच्या वर्षी लवकर या’च्या जयघोषात अवघी मुंबई दुमदुमून गेली होती. गिरगाव चौपाटी, दादर चौपाटी, जुहू बीच तसेच लालबाग आणि परळसारख्या प्रमुख गणेशोत्सव परिसरांमध्ये भाविकांचा अथांग सागर लोटला होता. अबालवृद्धांपासून ते तरुणांपर्यंत सर्वच जण बाप्पाच्या अंतिम दर्शन…
