मुंबईत अनधिकृत बॅनर्सना महापौरांचा दणका; सायन उड्डाणपुलावरील सर्वपक्षीय फलक हटवले!
मुंबई: शहराचे विद्रूपीकरण करणाऱ्या अनधिकृत बॅनर्सविरोधात मुंबईच्या महापौर रितू तावडे यांनी कडक पावले उचलली आहेत. आज महापौरांनी स्वतः रस्त्यावर उतरून सायन उड्डाणपुलावर पाहणी केली आणि अनधिकृत बॅनर्स हटवण्याच्या कारवाईचे नेतृत्व केले. विशेष म्हणजे, कोणताही राजकीय पक्षपात न करता उड्डाणपुलावरील सर्वपक्षीय बॅनर्स महापालिका पथकाच्या मदतीने तात्काळ काढून टाकण्यात आले. उड्डाणपूल आणि मुख्य चौकांवरील बेकायदा बॅनर्समुळे शहराच्या…
