शिराळा-वाळवा दुष्काळग्रस्त जाहीर करा; अन्यथा तहसीलवर जनआक्रोश!
शिराळा तालुक्यातील शेतकरी पाण्याविना मरू दिला जाणार नाही. शासनाने जाहीर केलेल्या दुष्काळग्रस्त यादीतून शिराळा व वाळवा तालुके वगळल्याने शेतकऱ्यांमध्ये तीव्र नाराजी आहे. पावसाने ओढ दिल्याने भात, सोयाबीन, भुईमूग, नाचणीसह पिके करपली असून चारा व पिण्याच्या पाण्याचा प्रश्नही गंभीर झाला आहे. त्यामुळे शासनाने तात्काळ फेरसर्वेक्षण करून शिराळा-वाळवा तालुक्यांचा दुष्काळी उपाययोजनांमध्ये समावेश करावा, तसेच पीकविमा, टँकर, चारा…
