करवसुलीत महाघोटाळा! मुंबई महापालिकेचे अधिकारी व जागा मालकांचे संगनमत
मुंबई पोलिस दलातील आरोप-प्रत्यारोप गाजत असतानाच मुंबई पालिकेतही कोट्यवधी रुपयांचा मालमत्ता करवसुलीचा घोटाळा झाल्याचा गंभीर आरोप केला जात आहे. त्यापैकी एकट्या वरळीत 100 कोटी व संपूर्ण मुंबईत 700 ते 800 कोटी रुपयांचा घोटाळा झाल्याचा खळबळजनक आरोप पालिकेतील विरोधी पक्षनेते रवी राजा यांनी केला.मुंबईतील मालमत्तेचे मोजमाप कमी प्रमाणात दाखवून मालमत्ता करवसुली कमी प्रमाणात दाखवली जात असल्याची…
