बीड मधील संतोष देशमुख हत्याकांड – मराठा क्रांती मोर्चाचा सरकारला २ दिवसांचा अल्टिमेटम
बीड – मराठा क्रांती मोर्चाच्या पदाधिकाऱ्यांनी बुधवारी बीडच्या मस्साजोग हत्याकांडातील पीडित कुटुंबीयांची भेट घेतली. यावेळी त्यांनी या प्रकरणातील मास्टरमाईंडला अटक करण्यासाठी सरकारला 2 दिवसांचा अल्टीमेटम देत बीडमधील गुन्हेगारीला आळा घालण्यासाठी जिल्ह्यातील सर्वच पोलिस अधिकाऱ्यांची महिन्याभरात बदली करण्याची मागणी केली. राज्य सरकारकडून या प्रकरणी त्वरीत कारवाईची अपेक्षा असल्याचे पदाधिकाऱ्यांनी म्हटले आहे.मस्साजोगचे माजी सरपंच संतोष देशमुख यांची…
