पदक कांस्य, पण मनुने रचला सोनेरी इतिहास
जो आनंद चंद्रावर पहिले पाऊल ठेवणार्या नील आर्मस्ट्राँगच्या चेहर्यावर होता, जे आनंदाश्रू सर्वप्रथम एव्हरेस्ट सर करणार्या तेनसिंग शेर्पाच्या डोळ्यात होते, त्याच भावना आज मनु भाकरच्या देहबोलीत दिसल्या. तिच्या पाणावलेल्या कडा सारं काही सांगून गेल्या. हिंदुस्थानी ऑलिम्पिकच्या इतिहासात नेमबाजीत पदक जिंकणारी पहिली महिला म्हणून मनुने पराक्रम केला. पदक कांस्य असले तरी तिने आज इतिहासाचे सोनेरी पान…
