भाजपच्या विजयी जल्लोषकडे फडणवीस यांच्यासह दिग्गज भाजप नेत्यांची पाठ- गड आला पण स्वाभिमान गेला
मुंबई/ शिवसेना फोडण्यापासून आघाडी सरकार पडण्यापर्यंत प्रत्येक आघाडीवर भाजपने यश मिळवले आणि राज्यात सत्तांतर घडवून आणले मात्र या सत्तांतर नाट्याचे प्रमुख नायक असलेले देवेंद्र फडणवीस यांच्यावर उपमुख्यमंत्रीपद नाईलाजाने स्वीकारण्याची वेळ आल्याने ते भाजपच्या जल्लोषात सामील होऊ शकले नाहीत .त्यामुळे गड आला पण स्वाभिमान गेला अशी भाजपची स्थिती झाली आहे .उदव ठाकरे यानी मुख्यमंत्रीपदाचा राजीनामा दिल्यावर…
