भारताच्या महिला संघानेही पाकिस्तानला लोळविले – वर्ल्डकप मध्ये पाकवर ८८ धावांनी विजय
कोलंबो/भारतीय महिला क्रिकेट संघानं पाकिस्तानच्या महिला क्रिकेट संघाला १५९ धावांवर बाद करत मोठा विजय मिळवला आहे. भारतानं हा सामना ८८ धावांनी जिंकला आहे. भारतानं प्रथम फलंदाजी करताना २४७ धावा केल्या होत्या. पाकिस्तानला विजयासाठी २४८ धावा करायच्या होत्या. मात्र, भारताच्या गोलंदाजांपुढं पाकिस्तानचा संघ १५९ धावांवर बाद झाला. भारतानं पाकिस्तान विरुद्ध सलग १२ वेळा विजय मिळवला आहे….
