वशिल्याला चाप ! मुंबई पालिकेत ६९५ अभियंत्यांच्या बदल्या ऑनलाईन संगणकीय लॉटरी पद्धतीने संपन्न
मुंबई:मुंबई महानगरपालिकेच्या (BMC) कारभारात पारदर्शकता आणण्याच्या दिशेने एक ऐतिहासिक आणि महत्त्वपूर्ण पाऊल उचलण्यात आले आहे. महानगरपालिकेने स्थापत्य (Civil) आणि यांत्रिकी/विद्युत (Mechanical/Electrical) विभागातील तब्बल ६९५ अभियंत्यांच्या बदल्या पूर्णपणे ऑनलाईन संगणकीय (लॉटरी) पद्धतीद्वारे पार पाडल्या आहेत. पालिकेच्या इतिहासात मानवी हस्तक्षेपाला फाटा देत पहिल्यांदाच अशा स्वरूपाची लॉटरी प्रणाली राबवण्यात आल्यामुळे राजकीय वर्तुळात व प्रशासकीय पातळीवर मोठी चर्चा रंगली…
