नारायण राणेंच्या विरोधात काँग्रेसचे राज्यभर आंदोलन
मुंबईः भाजप नेते व केंद्रीय मंत्री नारायण राणे यांनी हिंदू धर्मासाठी शंकराचार्यांचे योगदान काय? असा प्रश्न विचारून शंकराचार्य आणि हिंदू धर्माचा अपमान केला आहे. याविरोधात काँग्रेसने मुंबईसह राज्यभर आंदोलन केले. मुजोर नारायण राणेंची मंत्रिमंडळातून हकालपट्टी करा, अशी मागणी यावेळी करण्यात आलीकाँग्रेसचे मुख्यालय टिळक भवन येथे प्रदेश सरचिटणीस राजन भोसले, मुनाफ हकीम यांच्यासह पदाधिकारी व कार्यकर्ते…
