गुरूकडून बालेकिल्ला खेचण्यासाठी शिष्य सज्ज – माहीम विधानसभेत सैनिकांमध्ये अटीतटीची लढाई
मुंबई, (प्रतिनिधी)- प्रेमात आणि युद्धात… सॉरी निवडणूकीच्या युद्धात सारेकाही माफ असते. एकेकाळी सदा सरवणकर यांचा शिष्य असलेले महेश सावंत आपल्या गुरुंविरुद्ध निवडणूकीच्या रिंगणात उतरल्यामुळे माहीम विधानसभेत कांटे की टक्कर पाहायला मिळणार आहे. विशेष म्हणजे महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांचे पुत्र अमित ठाकरे यांनाही आमदारकीचा टीळा लावण्यासाठी निवडणूकीच्या रिंगणात उतरवल्यामुळे माहीमचा बालेकिल्ला जिंकण्यासाठी, राखण्यासाठी…
