दुकानावर मराठी पाट्या लावा अन्यथा दुप्पट मालमता कर भरण्याची शिक्षा – मुजोर दुकानदारांच्या विरुद्ध पालिकेचा बडगा
मुंबई: माननीय सर्वोच्च न्यायालयाच्या निर्देशानुसार बृहन्मुंबई महानगरपालिका कार्यक्षेत्रातील दुकाने व आस्थापनांवर मराठी भाषेत, देवनागरी लिपित ठळक अक्षरात नामफलक लावणे बंधनकारक आहे. असे असूनही मराठी नामफलक लावण्यास टाळाटाळ करणाऱ्यांवर आता कठोर बडगा उगारण्याचे निर्देश महानगरपालिका आयुक्त तथा प्रशासक भूषण गगराणी यांनी दिले आहेत. मराठी नामफलकन सलेल्या दुकाने व आस्थापनांना दिनांक मे 2024 पासून दुप्पट मालमत्ता कर…
