सरपंच हत्या प्रकरणी एसआयटी स्थापन – वाल्मिक कराडच्या साथीदारांचा शोध सुरु
बीड – सरपंच हत्या प्रकरणाचा तपास आता सीआयडीकडे देण्यात आला आहे. तसेच खंडणी प्रकरणात आरोपी वाल्मीक कराडला अटक देखील करण्यात आली आहे. वाल्मीक कराडला आता १४ दिवसांची पोलिस कोठडी सुनावण्यात आली आहे. याचसोबत आता संतोष देशमुख हत्या प्रकरणातील इतर आरोपींचा शोध घेणे सुरू आहे. शासनाकडून आता आयपीएस बसवराज तेली यांच्या नेतृत्वात एसआयटी स्थापन करण्यात आली…
