कुस्तीपटू विनेश फोगट , बजरंग पुनिया काँग्रेसमध्ये दाखल – विनेशला हरयाणाच्या जुलाना मधून उमेदवारी
नवी दिल्ली – पॅरिस ऑलिम्पिक गाजवलेल्या कुस्तीपटू विनेश फोगाटने अखेर शुक्रवारी काँग्रेसमध्ये प्रवेश केला. त्यांच्यासोबत कुस्तीपटू बजरंग पुनियाही काँग्रेसवासी झाली. यावेळी विनेश यांनी पहिल्यांदाच मीडियाशी बोलताना भाजपवर जोरदार प्रहार केला.काँग्रेसचे ज्येष्ठ नेते के. सी.वेणुगोपाल यांनी विनेश आणि बजरंग यांचे पक्षात स्वागत केले. यावेळी हरियाणा काँग्रेसचे नेतेही उपस्थित होते. राजकारणात नवी इनिंग सुरू केल्यानंतर मीडियाशी बोलताना…
