ठाणे / काल उधाव ठाकरे ठाणे दौऱ्यावर होते तिथल्या आरोग्य शिबिरात त्यांनी भाग घेतला आनंद दिघेंच्या पुतळ्याला पुषपहार घातला पण टेंभी नाक्यावरच्या आणण दिघेंच्या आनंद आश्रमाला मात्र भेट दिली नाही .त्यामुळे ठाण्यात उलट सुलट चर्चा होती मात्र नंतर खरे कारण पुढे आले आनंद आश्रमाच्या प्रवेशद्वारावर शिंदे गटाच्या शिवसेनेचा बाळासाहेबांची शिवसेना असा फलक लावलेला होता त्यामुळे उद्धव ठाकरे यांनी आनंद आश्रमात जाणे टाळले .
Similar Posts
फरारी निलेश चव्हाणला नेपाळ मधून अटक – वैष्णवीच्या बळाचा ताबा तिच्या आईकडे
पुणे/वैष्णवी हगवणे आत्महत्या प्रकरणात वैष्णवीच्या आई-वडिलांना बंदुकीचा धाक दाखवून धमकावणारा निलेश चव्हाण याला अखेर नेपाळमधून अटक करण्यात आली आहे निलेश च्या अटकेमुळे आगवणे कुटुंबातील अनेक रहस्य उघडकीस येण्याची शक्यता आहे दरम्यान वैष्णवीच्या छोट्या बाळाचा ताबा तिची आई स्वाती कस्पटे यांना देण्यात येणार आहे. पुण्यातील विवाहीत तरुणी वैष्णवी हगवणे हिने १६ मे रोजी गळफास घेऊन आपलं…
विशाळगडावरील नुकसानीची अजितदादांकडून पाहणी
कोल्हापूर: किल्ले विशाळगड येथील अतिक्रमण काढण्याबाबत आंदोलकांनी रविवार, १४ जुलै रोजी गडावरुन परत येताना मौजे गजापूर येथील मुसलमानवाडी या गावातील घरांचे आणि प्रार्थना स्थळाचे नुकसान केले. याबाबत नुकसानग्रस्त भागाची पाहणी राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी केली व स्थानिक पीडितांशी संवाद साधून दिलासा दिला. अतिक्रमणामध्ये संबंध नसलेल्या गावात गडावरुन परत येताना आंदोलकांनी मौजे मुसलमानवाडी येथे केलेल्या…
माझगावात गणेश आगमन मिरवणुकीवर अंडीफेक; मनोज जामसुतकर आणि अरविंद सावंत गप्प का?
मुंबईतील माझगाव परिसरात ‘माझगावचा मोरया’ गणपती मंडळाच्या आगमन मिरवणुकीवर एका इमारतीतून अंडी फेकल्याची धक्कादायक घटना घडली आहे. या प्रकारामुळे गणेशभक्तांमध्ये तीव्र संताप व्यक्त होत असून परिसरात काही काळ तणावाचे वातावरण निर्माण झाले होते. या प्रकरणी कारवाई करत पोलिसांनी अवघ्या ३६ तासांत आरोपी दानिश शेर खान (२२) याला अटक केली आहे.घटनेचे गांभीर्य ओळखून पोलिसांनी तातडीने पाच…
हेमंत करकरे यांच्या मृत्यू वरून राजकारण तापले – उज्वल निकम यांच्यावर टीका करणारे वडेट्टीवार अडचणीत
मुंबई/२६/११ चां मुंबई वरील हल्ल्यात एटीएस चे तात्कालीन प्रमुख हेमंत करकरे यांचा मृत्यू दहशतवादी कसाबच्या गोळीने झाला नाही तर संघाचा समर्थक असलेल्या पोलीस अधिकाऱ्याच्या गोळीने झाला मात्र ही माहिती सरकारी वकील उज्वल निकम यांनी लपवून ठेवली त्यामुळे निकम यांच्यावर देशद्रोहाचा गुन्हा दाखल करावा अशी मागणी विरोधी पक्ष नेते विजय वडेट्टीवार यांनी केली होती त्यामुळे वडेट्टीवार…
राज्यातील २० आयएएस अधिकाऱ्यांच्या बदल्या-तुकाराम मुंडे यांच्याकडे भाषा विभाग
मुंबई – राज्यात पुन्हा एकदा सनदी अधिकाऱ्यांच्या बदल्या करण्यात आल्या आहेत. आज 20 आयएएस अधिकाऱ्यांच्या बदल्यांचे आदेश जारी करण्यात आले आहेत. नाशिक महापालिका आयुक्त डॉ. चंद्रकांत पुलकुंडवार यांची बदली करण्यात आली आहे. त्यांच्याकडे आता साखर आयुक्त म्हणून नवीन जबाबदारी देण्यात आली आहे. संजीव जयस्वाल यांची म्हाडाचे उपाध्यक्ष व मुख्य कार्यकारी अधिकारी पदी बदली झाली आहे….
भ्रष्टाचार प्रकरणी आघाडी सरकारचे २० मंत्री रडारवर
ठाणे/ वेगवेगळ्या भ्रष्टाचारात अडकलेले महा विकास आघाडी मधील २० मंत्री तपास यंत्रणांच्या रडारवर आहेत त्यातील अनिल परब,प्रताप सरनाईक,जितेंद्र आव्हाड,हसन मुश्रीफ हे लवकरच जेल मध्ये जातील असे किरीट सोमय्या यांनी सांगितले ते काल ठाण्याच्या पाच पाखडी भागात भाजप कार्यकर्त्यांशी संवाद साधण्यासाठी आले होते
