मुंबई (प्रतिनिधी) : जीवनविद्या मिशनचे प्रणेते सदगुरु श्री वामनराव पै यांच्या धर्मपत्नी शारदामाई यांचे आज दुपारी २ वा ९ मिनिटांनी त्यांच्या राहत्या घरी निर्वाण झाले. त्या ९७ वर्षाच्या होत्या .त्यांच्या पश्चात त्यांचे चिरंजीव व जीवनविद्या मिशनचे आजीव विश्वस्त श्री प्रल्हाद वामनराव पै व सुकन्या मालन कामत तसेच त्यांचे नातू निखिल पै, स्वप्निल कामत व नातसून प्रिया निखिल पै व पणतू यश पै असा परिवार आहे. शारदा माईंच्या महानिर्वाणामुळे जीवनविद्या परिवारावर शोककळा पसरली आहे. सद्गुरु श्री वामनराव पै यांच्या महानिर्वाणानंतर जीवनविद्या मिशनच्या प्रत्येक कार्यक्रमात शारदामाई यांचा सक्रीय सहभाग व आशीर्वाद सदैव लाभत असे. जीवनविद्या मिशनच्या प्रत्येक नामधारकाला त्यांचे मातृतुल्य प्रेम, मार्गदर्शन मिळत असे. त्यांच्या निर्वाणाने जीवनविद्या मिशनमध्ये कधीही भरुन न येणारी पोकळी निर्माण झाली आहे.
Similar Posts
वक्फ – संशोधन विधेयक लोकसभेत मंजूर
नवी दिल्ली/संपूर्ण देशाचे लक्ष लागून राहिलेल्या वक्त संशोधन विधेयक अखेर रात्री उशिरा संसदेत २८८ विरुद्ध २३३ मतांनी मंजूर झाले आता हे विधेयक राज्यसभेत मांडले जाणार आहे हे विधेयक मंजूर होणे हा केंद्रातील एनडीए सरकारचा फार मोठा विजय आहेवक्त संशोधन विधेयक अल्पसंख्यांक मंत्री किरण रिजिजू यांनी लोकसभेत मांडले त्यानंतर या विधेयकावर सत्ताधारी आणि विरोधक यांच्यात गरमागरम…
१३वर्षाच्या मुलीवर६रिक्षा चालक व २ रेल्वे कामगारांचा सामूहिक बलात्कार
पुणे/ महाराष्ट्रात महिलांवरील अत्याचारांच्या घटना दिवसेंदिवस वाढत असून पुण्यात एका १३वर्षाच्या मुलीवर ६रिक्षाचालक आणि २रेल्वे कर्मचाऱ्यांनी सामूहिक बलात्कार केल्याची संतापजनक घटना घडली आहे .सर्व आरोपींना पोलिसांनी अटक केली असून पिढीत मुलीवर रुग्णालयात उपचार सुरू आहेतएक १३वर्षाची मुलगी३१ऑगस्टला पुणे रेल्वे स्थानकात तिच्या मित्राला न्यायला आली होती पण तो आला नाही त्यामुळे परत जाण्यासाठी तिने रिक्षा केली…
५ राज्यांच्या विधानसभा निवडणुकीचे बिगुल वाजले
दिल्ली – आज निवडणूक आयोहाने देशांच्या ५ राज्यातील विधानसभा निवडणुकीच्या तारखांची घोषणा केली. त्यानुसार मिझोरामच्या ४० जागांसाठी ७ नोव्हेंबरला,छत्तीसगडमध्ये ७ आणि १७ नोव्हेंबर अशा २ टप्प्यात निवडणूक होणार आहेत. १७ नोव्हेंबरला मध्य प्रदेशच्या २३० जागांसाठी, २३ नोव्हेंबरला राजस्थानातील २०० जागांसाठी आणि शेवटी ३० नोव्हेंबरला तेलंगणातील ११९ जागांसाठी निवडणूक होणार आहे या निवडणुकीचा ३ डिसेंबरला निकाल…
ताज्या बातम्या | महाराष्ट्र | मुंबई | राजकीयफडणवीसांचा महाराष्ट्राला धक्का- एकनाथ शिंदे महाराष्ट्राचे मुख्यमंत्री तर फडणवीस उप मुख्यमंत्री
मुंबई/ राजकारणात धक्कातंत्र ही फक्त पवारांनीच मक्तेदारी होती पण देवेंद्र फडणवीस हे त्यांच्यापेक्षा दोन पावले पुढे निघाले शिंदेंच्या बंडपासून ते नव्या सरकारच्या सतास्थापनेत मुख्य सुत्रधार फडणवीस होते त्यामुळे तेच मुख्यमंत्री होतील असे वाटले होते पण त्यांनी एकनाथ शिंदेंना मुख्यमंत्रीपदी बसवून संपूर्ण महाराष्ट्राला धक्का दिला आहे .शिंदेंच्या बंडा पासून त्या सर्व आमदारांना बडोदा,गोहाती आणि आता गोव्यात…
उद्धव ठाकरे हिरव्या झेंड्याच्या तालावर नाचले- देवेंद्र फडणवीस यांच्या टिके मुळे शिवसेना संतप्त
*मुंबई/मी ढेकणाच्या नादाला लागत नाही कारण ढेकणाला बोटानी चिरडलं जातं तुझ्या नादाला लागला एवढ्या कोटीचा तू नाहीस अशा शब्दात माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी देवेंद्र फडणवीस वर टीका केली होती .त्या टिकेचा समाचार घेताना आज देवेंद्र फडणवीस यांनी उद्धव ठाकरेंवर कडाडून हल्ला केला ते म्हणाले उद्धव ठाकरे हिरव्या झेंड्याच्या तालावर नाचले याचा आम्हाला खूप दुःख…
औरंगजेब क्रूर नव्हता अबू आजमीचा जावई शोध महाराष्ट्रात संतापाची लाट
मुंबई/औरंगजेब हा क्रूर नव्हता तर तो एक उत्तम प्रशासक होता त्याने हिंदुस्थानात अनेक मंदिरे बांधली तसेच त्याच्यामुळे अनेक हिंदूंना न्याय मिळाला असे वादग्रस्त विधान करणाऱ्या समाजवादी पक्षाचे आमदार अबू आजमी यांच्याविरुद्ध महाराष्ट्रात संतापाची लाट उसळली आहे सर्वच राजकीय पक्षातील नेत्यांनी अबू आजमी च्या या विधानावर तीव्र अक्षय घेत त्याच्यावर कारवाई करण्याची मागणी केली आहेऔरंगजेबाने महाराष्ट्रावर…
