मुंबई/ काल अखेर शिंदे भाजप युती सरकारचे खाते वाटप झाले मात्र गृह आणि अर्थ ही प्रमुख खाती फडणवीस यांनी स्वतःकडे ठेवली आहेत त्यामुळे शिंदे गटाचे मंत्री नाराज आहेत
भाजपने महसूल खाते राधाकृष्ण विखे पाटील यांना दिले आहे तर ग्राम विकास गिरीश महाजन यांच्याकडे आहे कामगार खाते सुधा भाजपच्या सुरेश खाडेंकडे आहे . पर्यटन आणि सहकार यासारखी महत्वाची खातीही भाजपकडे आहेत तर शिंदे गटाकडे कृषी,शालेय शिक्षण,राज्य उत्पादन शुल्क .पर्यटन आरोग्य यासारखी खाती आहेत परिणामी शिंदे गटाचे मंत्री खूप नाराज आहेत
शिंदे फडणवीस यांनी मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री पदाची शपथ घेतल्यानंतर 38 दिवसांनी मंत्रिमंडळ विकास झाला यात दोघांनीही प्रत्येकी 9 याप्रमाणे 18 मंत्री पदे वाटून घेतली आणि त्यानंतर आठवड्यांनी मंत्रिमंडळाचे काल खातेवाटप झाले मात्र महत्वाची खाती भाजपकडे गेल्याने शिंदे गटात धुसफूस सुरू झाली आहे ही नाराजी सरकारला कधीही अडचणीत आणू शकते
बॉक्स
मंत्री आणि त्यांची खाती
एकनाथ शिंदे ( मुख्यमंत्री)
नगरविकास ,सामान्य प्रशासन,माहिती व तंद्रज्ञान परिवहन आदी मिळून 13 खाती
देवेंद्र फडणवीस( उप मुख्यमंत्री)
अर्थ,गृह,नियोजन,विधी व न्याय,जलसंपदा,ऊर्जा,गृहनिर्माण ,राजशिष्टाचार
भाजपचे मंत्री-
राधा कृष्ण विखे पाटील
महसूल,पशुसंवर्धन,दुग्धविकास
सुधीर मुनगंटीवार
वणे,सांस्कृतिक कार्य,मत्स्य व्यवसाय
चंद्रकांत पाटील
उच्च व तंत्र शिक्षण,वस्त्रोद्योग,संसदीय कार्य
विजयकुमार गावीत
आदिवासी विकास
गिरीश महाजन
ग्रामविकास,वैद्यकीय शिक्षण,क्रीडा,युवक कल्याण
सुरेश खाडे
कामगार
रवींद्र चव्हाण
सार्वजनिक बांधकाम( सार्वजनिक उपक्रम वगळून), अन्न व नागरी पुरवठा
अतुल सावे
सहकार,बहुजन कल्याण
मंगल प्रभात लोढा
पर्यटन,महिला व बालविकास,कौशल्य विकास,उद्योजकता
गुलाबराव पाटील
पाणी पुरवठा व स्वच्छता
दादा भुसे
बेंद्रे व खानिकर्म
संजय राठोड
अन्न व औषध प्रशासन
संदीपान भुम्रे
रोजगार हमी ,फलोत्पादन
उदय सामंत
उद्योग
तानाजी सावंत
सार्वजनिक आरोग्य,कुटुंब कल्याण
दीपक केसरकर
शालेय शिक्षण,मराठी भाषा
अब्दुल सत्तार
कृषी
शंभूराजे देसाई
राज्य उत्पादन शुल्क
