सध्याचे राजकारण हे गटारातून वाहणाऱ्या घान पाण्यापेक्षाही घाणेरडे आहे.आणि कुठलाही सज्जन माणूस या घाणेरड्या पाण्याच्या आसपास सुधा फिरकणार नाही या लोकांच्या आसपास फक्त आणि फक्त इलेक्ट्रॉनिक मिडीयावाले आहेत.आणि 24 तास ते लोक याच घाणेरड्या राजकारणाच्या बातम्या दाखवत आहेत. आणि त्या बघून बघून लोकांना इतका कंटाळा आलाय की काहींनी आपल्या केबल ऑपरेटर ना सांगून न्यूज चॅनल बंद करायला लावले आहेत. .काय करणार ? त्याच त्याच बातम्या किती वेळ बघणार शिवाय बरेचसे चॅनल हे राजकीय पक्षांच्या पे रोलवर असल्याने त्यांच्याकडून मोठ्या प्रमाणावर प्लांट म्हणजेच पेरलेल्या बातम्या दाखवल्या जात आहेत.आणि म्हणूनच लोकांना या इलेक्ट्रॉनिक मीडियाचा तिटकारा आला आहे. .काही लोकांनी तर इलेक्ट्रॉनिक मीडियावर बंदी घालण्याची मागणी केली आहे कारण राजकारणाच्या फेक आणि एका विशिष्ट पक्षाला फेवर करणाऱ्या बातम्या बघून लोकांचे डोके फिरायची पाळी आली आहे.कारण या लोकांनी सर्व ताळतंत्र सोडून पत्रकारितेची अक्षरशः वाट लावली आहे . यांच्या पेक्षा 200 / 400 रुपयांसाठी अनधिकृत बांधकामाच्या बातम्या छापणारे लोक परवडले. इतका पत्रकारितेचा स्तर या इलेक्ट्रॉनिक मीडियावाल्यांनी खाली घसरवला आहे आणि लोकशाहीसाठी हे घातक आहे. सध्या महाराष्ट्राच्या राजकारणात शिवसेनेतील फुटिमुळे इलेक्ट्रॉनिक मीडियाला सहा महिन्याचा मसाला मिळाला आहे आणि प्रत्येक चॅनल वाला सध्या तेच दाखवतोय .जगात जणू काही या काळात काहीच घडलेले नाही.शेतकरी,अतिवृष्टी,सरकारी अधिकाऱ्यांचा भ्रष्टाचार,शैक्षणिक क्षेत्रातील विद्यार्थ्यांच्या अडचणी,उद्योग धंद्याच्या समोरील अडचणी,मोठ्या कंपण्यांमधून होणारी कामगार कपात असे कितीतरी विषय आहेत . पण त्याकडे ढुंकूनही बघितले जात नाही इलेक्ट्रॉनिक मिडियाचे पाटेकर हातात बूम घेऊन भिकऱ्या सारखे पुढाऱ्यांच्या मागे फिरत असतात.टिव्हीवर सतत एकनाथ शिंदे,उद्धव ठाकरे,संजय राऊत आणि किरीट सोमय्या यांचेच चेहरे गेल्या काही दिवसांपासून न्यूज चॅनल वर दिसत आहेत.आणि लोकांना कंटाळा येई पर्यंत सारखं सारखं तेच दाखवल जात आहे.त्यापेक्षा इंदोरीकर महाराजांचे कीर्तन ,किंवा अमृता मामींचे गाणे ऐकायला परवडले असते.पण नको त्या राजकारणाच्या बातम्या असे वाटू लागले आहे.हे जर असेच चालू राहिले तर न्यूज चॅनल ची टी आर पी रसातळाला जाईल आणि शेवटी पुन्हा टीआरपी मिळवण्यासाठी सनी लिऑनचा गरम मसाला दाखवण्याची या लोकांवर पाळी येणार आहे.कारण अति तेथे माती हे ठरलेलेच आहे.राजकारणाचा हा किळसवाणा सिनेमा इलेक्ट्रॉनिक मीडियाच्या बॉक्स ऑफिसवर फार काळ चालणार नाही लोक भयंकर वैतागले आहेत.लोकांमध्ये राजकारण आणि राजकारणी पुढाऱ्यां बद्दल अगोदरच चीड आहे .आणि त्यांना सारखे सारखे टिव्हीवर दाखवले जात असल्याने इलेक्ट्रॉनिक मीडिया वर लोक चिडले आहेत
Similar Posts
मुंब्रा दुर्घटनेची माहिती असल्यास कळवा- रेल्वेचे नागरिकांना आवाहन
ठाणे/आठवड्याच्या पहिल्याच दिवशी दिवा आणि मुंब्रा स्थानकांदरम्यान दुर्दैवी अपघात घडला. याल अनेक प्रवाशांनी जीव गमावले तर काही प्रवासी जखमी झाले. परंतु, घटना नेमकी कशी घडली, हे कोडे रेल्वेला सुटत नसल्याने आता प्रशासनाने घटनेबद्दल नागरिकांना माहिती पाठविण्याचे आवाहन केले आहे.यासाठी त्यांनी नंबर तसेच इ-मेल जारी केला आहे.मुंब्रा स्थानकाजवळ सोमवारी घडलेल्या दुर्घटनेची सखोन चौकशी करण्यासाठी मध्य रेल्वेने…
भाजपा आमदराकडून मुंबईचा अपमान- गरीब की जोरू, सब की भाभी
मुंबई/ आगामी निवडणुकीत मुंबई महापालिका जिंकण्याचे स्वप्न पाहणाऱ्या भाजपच्या मनात मुंबई बद्दल किती प्रेम आणि किती आकस आहे हे काल भाजप आमदार योगेश सागर यांनी दाखवून दिले .विधानसभेत रस्त्यावरील खड्ड्यांच्या प्रश्नावर बोलताना त्यांनी अक्षरशः मुंबईच्या इज्जतीलाच हात घातला आणि मुंबईचा उल्लेख गरीब की जोरु सबकी भाभी असा केला . हा मुंबईचा अपमान असून मुंबईकर जनतेत…
राज्यपाल रमेश बैस यांची किल्ले प्रतापगडास भेट
सातारा दि. २४ – राज्यपाल रमेश बैस यांनी किल्ले प्रतापगडास सहकुटुंब भेट दिली. शिवकालीन खेडेगावास दिली भेट राज्यपाल श्री बैस यांनी वाडा कुंभरोशी येथील शिवकालीन खेडेगाव हस्तकला केंद्र, किल्ले प्रतापगड माची येथेही भेट दिली. …
दिल्लीत दिवसा ढवळ्या विद्यार्थिनीवर ऍसिड हल्ला!
नवी दिल्ली/राजधानी दिल्ली ही महिलांसाठी सुरक्षित नाही हे पुन्हा एकदा समोर आले आहे. दिल्लीतील लक्ष्मीबाई कॉलेजजवळ एका विद्यार्थिनीवर अॅसिड हल्ला झाला आहे. रविवारी सकाळी साडेअकरा वाजण्याच्या सुमारास ही घटना घडली आहे. या घटनेनंतर जखमी विद्यार्थिनीला दीपचंद बंधू रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले आहे. ही विद्यार्थिनी लक्ष्मीबाई कॉलेजमध्ये दुसऱ्या वर्षात शिकत असल्याची माहिती समोर आली आहे.समोर…
काँग्रेसच्या शिबिरास उशिरा पोहचलेल्या राहुल गांधीना १० पुश अपची शिक्षा
भोपाळ/मध्यप्रदेशातील पचमढीत सुरू असलेल्या काँग्रेसच्या प्रशिक्षण शिबिरात राहुल गांधींना दोन मिनिटांचा उशीर महागात पडला. शिबिरातील अनुशासन मोडल्यामुळे काँग्रेस खासदार आणि विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांना काढण्याची शिक्षा देण्यात आली. काँग्रेसने सर्वांसाठी समान नियम असल्याचा दावा केला असला तरी, या घटनेने पुन्हा एकदा राहुल गांधींची शिस्त अधोरेखीत झाली आहे.काँग्रेसचे मीडिया समन्वयक अभिनव बरोलिया यांनी सांगितले की,…
पत्रकार संघाचे लोणावळ्यातील विश्रामधाम-कौटुंबिक जिव्हाळा जपेल- रामशेठ ठाकूर
मुंबई- बातम्यांच्या रोजच्या धकाधकीत पत्रकार आणि त्यांच्या कुटुंबीयांसाठी क्षणभर विश्रांतीसाठी मुंबई मराठी पत्रकार संघाने लोणावळा येथील दी. गो. तेंडुलकर स्मृतिमंदिरातील विश्रामधामाचे हाती घेतलेले नूतनीकरण वेळेत पूर्ण होईल, असा आशावाद व्यक्त करीत हे विश्रामधाम कौटुंबिक जिव्हाळा जपणारे केंद्र बनेल, अशा शब्दात माजी खासदार लोकनेते रामशेठ ठाकूर यांनी शुभेच्छा दिल्या. २० लाख रुपयांची वैयक्क्तिक देणगीही त्यांनी या…
