मुंबई/ गुडी पाडवा मेळाव्याच्या निमित्ताने राज ठाकरे यांनी मुंबईच्या शिवतीर्थावर जे भाषण केले त्यावर सेनेतील बडे नेते भलेही टीका करीत असेल तरी सामान्य शिवसैनिक मात्र राजच्या भाषणाने प्रभार्वित झाला आहे .कारण मुस्लिमांच्या विरोधात प्रथमच एका मराठी नेत्याने जाहीरपणे आवाज उठवून मशिदींवरील भोंगे काढून टाकण्याची मागणी केली आहे . त्यामुळें महाराष्ट्रातील सर्वच पक्षातील मराठी तरुण खुश झाले आहेत . राज ठाकरे त्यांच्या भाषणात म्हणाले होते की मशिदींवरील भोंगे बंद झाले नाहीत तर त्याच्या समोरच दुप्पट भोंगे लावून त्यावर मोठ्याने हनुमान चालीसा लावावा असा राजने आदेश दिला .त्यानंतर घाटकोपर चांदिवली आदी भागात मनसैनिकांनी मशिदी समोर तसेच आपल्या शाखांवर भोंगे लाऊन हनुमान चालीसा सुरू केला .पण पोलिसांनी कारवाई सुरू केली मात्र राजच्या त्या भूमिकेमुळे शिवसेना आणि भाजपातील तरुणही खुश झाले आहेत .त्यामुळे कदाचित भविष्यात शिवसेना आणि इतर पक्षातील तरुण मनसेत येऊन मनसेची ताकद वाढू शकते
Similar Posts
दिवाळीत घातपाताचा कट फसला!पंजाबमधून आयएसआयचे दोन दहशतवादी पकडले
अमृतसर/पंजाबच्या अमृतसर पोलिसांनी केंद्रीय यंत्रणांच्या सहकार्याने दोन दहशतवाद्यांना अटक केली आहे. पोलिसांनी त्यांच्याकडून एक अँटी-टँक रॉकेट लाँचर जप्त केले आहे, ज्याचा वापर ते दिवाळीला मोठा हल्ला करण्यासाठी करणार होते. तथापि, हल्ला होण्यापूर्वीच पोलिस पथकांनी त्यांना अटक केली.डीजीपी गौरव यादव म्हणाले की, हे दोन्ही आरोपी पाकिस्तानच्या गुप्तचर संस्थेच्या, आयएसआयच्या एका अधिकाऱ्याच्या संपर्कात होते, ज्याने त्यांना ही…
बारावीचे 11 तर दहावीची 21 फेब्रुवारीला परीक्षा 15 मे रोजी निकाल
मुंबई/सर्व विद्यार्थ्यांनी पालकांचे लक्ष लागून राहिलेल्या दहावी आणि बारावीच्या परीक्षेची तारीख जाहीर झाली आहे बारावीची परीक्षा 18 फेब्रुवारीला तर दहावीची परीक्षा 21 फेब्रुवारीला होणार आहे दरवर्षीच्या तुलनेत यंदा या दोन्ही परीक्षा दहा ते पंधरा दिवस अगोदर होत असून पुढील दोन दिवसात हॉल तिकीट मिळण्याची शक्यता आहेराज्य माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाने आज परीक्षांची तारीख…
भायखळ्यात उत्तुंग इमारतीला आग मुंबईतील मोठमोठ्या टॉवरच्या फायर ऑडिट चा प्रश्न ऐरणीवर
मुंबई/पालिकेच्या विभागातील अग्निशमन दलाच्या मुख्यालयापासून काही अंतरावरच असलेल्या एका उत्तुंग इमारतीच्या ४२व्या माळ्यावर आग लागली. ही आग विझवताना अग्निशामन दलाच्या अक्षरशः नाकी दम आला याचे कारण अग्निशमन दलाकडे जी शिडी आहे ती फक्त २८ मजल्यांपर्यंतच पोहोचू शकते .आणि आग तर ४२ व्या मजल्यावर लागली होती.त्यातच आगीमुळे इमारतीचा विद्युत पुरवठा बंद करावा लागल्याने या आगीत अडकलेल्या…
मोदींकडून विरोधी पक्षाचे वस्त्रहरणसरकार विरुद्धचा अविश्वास प्रस्ताव फेटाळला
नवी दिल्ली – अखेर विरोधकांचा अविश्वास प्रस्ताव लोकसभेत आज फेटाळण्यात आला आहे. गेल्या तीन दिवसांपासून लोकसभेत अविश्वासाचा प्रस्ताव सादर झाल्यापासून जोरदार खडाजंगी रंगलेली बघायला मिळाली. यावेळी सत्तेतील आणि विरोधातील अनेक नेते आमनेसामने आले. त्यानंतर आज पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी लोकसभेत भूमिका मांडली. नरेंद्र मोदी यांनी लोकसभेत तब्बल अडीच तास भाषण केलं. त्यांनी आपल्या भाषणात मणिपूरच्या…
केजरीवाल यांच्या भ्रष्टाचाराची पोलखोल- बंगल्याच्या सुशोभीकरनासाठी ४५ कोटी
दिल्ली – अण्णांच्या भ्रष्टाचार विरोधी आंदोलनामुळे प्रसिद्धीच्या झोतात आले आणि नंतर आम आदमी पक्ष कडून दिल्लीचे मुख्यमंत्री झालेले अरविंद केजरीवाल यांचा पक्ष आणि स्वतः केजरीवाल यांच्यावरही भ्रष्टाचाराचे आरोप होत आहेत. दारू घोटाळ्यात त्यांचे दोन तुरुंगात आहेत तर केजरीवाल चौकशी सुरु आहे . आणि तेही वाटेवर असल्याचे बोलले जात आहे.दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांच्या बंगल्याच्या नूतनीकरणाचे…
ताज्या बातम्या | महाराष्ट्र | मुंबई | राजकीयधर्मयुद्ध जिंकायचे असेल तर कूटनीती वापरावीत लागते – फडणवीस
मुंबई- धर्मयुद्ध जिंकायचं असेल तर कूटनीती वापरावीच लागते. शिंदे सोबतची युती भावनिक तर अजितदादांबरोबरची युती राजकीय असे देवेंद्र फडणवीस यांनी म्हटले आहे.२०१९ मध्ये उद्धव ठाकरेंनी आपल्या पाठीत खंजीरच खुपसला. बेईमानीशिवाय याला काहीही म्हणता येत नाही. तुम्ही बघा मोदींचे मोठमोठे फोटो लावून मतं मागितली होती. त्यांचे फोटो लावून तुम्ही मतं मागितली आणि मग तुम्ही काँग्रेस राष्ट्रवादीच्या…
