कधीकाळी मुंबईतला मराठी माणूस हा मुंबईची शान होता तर मुंबईची चाळ संस्कृती ही मराठी माणसाच्या धार्मिक आणि सामाजिक अस्मितेची ओळख होती या सारखे सन मुंबईत मोठ्या उत्साहात साजरे केले जायचे पण काळाच्या ओघात तो सर्व आनंद तो सर्व उत्साह कुठल्या कुठे गडप झाला कारण गिरणी कामगारांच्या संपात मुंबईतील संपूर्ण गिरणगाव आणि इथला मराठी माणूस पूर्णपणे उध्वस्त झाला गिरण्या बंद पडल्याने मुंबईतील घरदार विकून लोक गावी गेले तर काहींनी मुंबईच्या बाहेर जाणे पसंत केले पण मुंबईतून मराठी माणूस परागंदा होत असताना कुठल्याही राजकीय पक्षाने त्याला मदतीचा हात दिला नाही ही आहे मुंबईतील मराठी माणसाची शोकांतिका आज महाराष्ट्राच्या या राजधानीत मराठी माणूस आपल्या अस्तित्वाची लढाई लढतोय कारण त्याने लढून मिळवलेली मुंबई त्याच्या हातून कधीच गेली मुंबईत मराठी माणूस केवळ इतिहासाच्या पानावराच दिसणार आहे .उर्वरित महाराष्ट्राची सुधा हीच स्थिती आहे निसर्गाचा प्रकोप आणि सरकारची अनास्था यामुळे बळीराजा कर्जबाजारी होऊन आत्महत्या करतोय गेल्या दहा वर्षात महाराष्ट्रातील 42हजार कर्जबाजारी शेतकर्यांनी आत्महत्या केल्या आहेत ग्रामीण भागात शेतीला पर्यायी व्यवस्थाच नसल्याने शेतकरी हवालदिल झालंय गेल्या साठ वर्षांत येथे वेगवेगळ्या पक्षांची सरकारे आली यशवंतराव चव्हाण,वसंतराव नाईक शरद पवार यांच्या सारखे कर्तबगार नेते मुख्यमंत्री झाले पण महाराष्ट्राच्या ग्रामीण भागाचे पुरेसे औद्योगीकरण झाले नाही किंवा शेती व्यवसायातही काही अमुलाग्र बदल झाले नाही त्यामुळे ग्रामीण भागाचा विकास होऊ शकला नाही परिणामी फक्त आणि फक्त शेतीवर अवलंबून असलेला शेतकरी कर्जाच्या दुष्ट चक्रातून बाहेर रिवर्ही शकला नाही दुष्काळ,अतिवृष्टी,गारपीट यामुळे शेतकर्यांचे नुकसान होत असताना नेते मंडळी मात्र रिकाम्या हाताने शेताच्या बांधावर फेरफटका मारायला जाताना दिसत होती पण यावेळी शेतकर्याच्या मुलाला दोन रुपयाचे चने शेंगदाणे देण्याचे सुधा त्यांनी औदार्य दाखवले नाही की आत्महत्या केलेल्या शेतकर्याच्या कुटुंबीयांची विचारपूस करायला जाताना शेतकर्याच्या विधवा पत्नीला शे दोनशे रुपयांची कुणी दिली नाही आणि अशा पुढार्यांच्या हाती आमचा महाराष्ट्र आहे साठ वर्षांच्या नंतरही मागे वळून पाहिल्यावर जर अंधार दिसत असेल तर राज्यकर्त्यांनी इतकी वर्ष काय केलं आणि कुठे नेवून ठेवला माझा महाराष्टॄ असा प्रश्न आज लोक विचारात आहेत एक मे म्हणजेच महाराष्ट्र दीन! या दिनाचे आणखी एक वैशिष्ट म्हणजे हा दिवस कामगार दीन म्हणूनही साजरा केला जातो पण आज महाराष्ट्र आणि महाराष्ट्रातील कामगारांची दुर्दशा पाहिल्यावर खरोखरच हा दिवस साजरा करण्याची नैतिकता आमच्यात आणि खास करून इथल्या राजकारण्यांमध्ये उरली आहे का हाच खरा प्रश्न आहे.मूठभर मावळ्यांना सोबत घेवून बलाढ्य आदिलशाही, निजामशाही आणि मोगलांशी संघर्ष करून स्वराज्याचे तोरण बांधणार्या शिवप्रभुवचा हा महाराष्ट्र ! वर्ण व्यवस्थेवर घाला घालून एका मोठ्या उपेक्षित समाजाला त्याचा न्याय हक्क मिळवून देवून त्याला देशाच्या मुळ प्रवाहात आणणार्या डॉ. बाबासाहेब आंबेडकर, राजश्री शाहू महाराज ,ज्योतिबा फुले सावित्रीबाई फुले यांच्या सारख्या थोर समाज सुधाकराचां हा महाराष्ट्र आज कुठे आणि कसा असायला हवा होता कला, क्रीडा, संस्कृती, शौर्य, प्रतिभा,आदी ज्ञरीहररींहळ महाराष्ट्र मागे नव्हता आर्थिक आणि सामाजिक दृष्ट्या देशातील सर्वाधिक प्रगात राज्य अशी महाराष्ट्राची ख्याती होती पण दुर्दैवाने आज महाराष्ट्राची ही ओळख पुसली गेलीय कारण इथल्या राजकारण्यांनी स्वतःच्या शुल्लक स्वार्थासाठी महाराष्ट्राला विकून खायचे बाकी ठेवले आहे .आज महाराष्ट्रावर सहा लाख कोटींचे कर्ज आहे हे कर्ज कोणी कशासाठी घेतले त्यातून महाराष्ट्राचा किती विकास झाला किती प्रकल्प उभे राहिले किती लोकांना रोजगार मिळाला या बद्दल राज्यातील जनतेला काहीच ठावूक नाही मात्र हे कर्ज जनतेने फेडायचे आहे.अशी अवस्था आहे या महाराष्ट्राची संयुक्त महाराष्ट्राच्या चळवळीत 105हुतात्म्यांनी प्राणाची आहुती देऊन मुंबईसह महाराष्ट्र मिळवला.मुंबई देशाची आर्थिक राजधानी झाली तर महाराष्ट्राची राजधानी झाली पण या राजधानीची आज धर्मशाळा झाली आहे देशाच्या काना कोपर्यातून कुणीही येतो कुठेही तंबू ठोकतो मिळेल त्या मोकळ्या जागेवर पथारी पसरतो त्यामुळे मुंबईत ना फुटपाथ शिल्लक राहिली आहे ना खेळाची मैदाने! पण कुणालाच त्याचे काही सोयर सुतक नाही मुंबई प्रमाणेच महाराष्ट्रातील इतर शहरांची सुधा तशीच स्थिती आहेत शहरांचे औद्योगीकरण होत असल्याने शहरे कशीही वेडी वाकडी वाढत चालली आहेत आणि या वाढत चाललेल्या शहरांना नागरी सुविधा पुरवताना तिथल्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या नाकी दम येतोय.खरे तर उद्योग धंद्यासाठी महाराष्ट्र एक सुरक्षित राज्य होते पण आज नवीन उद्योग येण्याचे सोडाच इथे असलेले उद्योग धंदे सुधा दुसर्या राज्यात जात आहेत त्यामुळे इथल्या स्थानिक जनतेवर बेरोजगार होण्याची पाळी आलीय.आज कामगार दीन पण कामगारांची काय अवस्था आहे
Similar Posts
ताज्या बातम्या | महाराष्ट्र | मुंबई | राजकीयविधानसभा अधिवेशनात सरकारची कसोटी
मुंबई/ आजपासून मुंबईत राज्य विधी मंडळाचे अर्थसंकल्पीय अधिवेशन सुरू होत आहे.मात्र शिवसेना भाजपतील संघर्ष पाहता हे अधिवेशन वादळी ठरणार असून 11 मार्चला उपमुख्यमंत्री आणि अर्थमंत्री अजित पवार राज्याचा अर्थसंकल्प सादर करणार आहेत त्यामुळे या अर्थसंकल्पात जनतेसाठी काय वाढून ठेवले आहे याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.गेल्या दीड वर्षापासून कोरोनाचे सावट असल्याने विधी मंडळाचे पूर्ण वेळ अधिवेशन…
चिपळूण व महाड आपदग्रस्तांसाठी जीवनावश्यक सामुग्री रवाना
विरार दि. 27: रा. स्व. संघ व जनकल्याण समिती वसईतर्फे चिपळूण व महाड आपदग्रस्तांसाठी जीवनावश्यक सामुग्री रवाना करण्यात आली. अतिवृष्टीमुळे चिपळूण व महाड येथील जनतेचे घरदार उध्वस्त झाले. आप्तस्वकीयांचा मृत्यू झाला. दुःखाचा डोंगर कोसळलेल्या कोकणातल्या बांधवांना आपत्कालीन मदतीचे वसईत समाजमाध्यमांवर मदत करण्याचे आवाहन करण्यात आले. त्यास वसईतील नागरिकांनी उत्तम प्रतिसाद दिला. कमीत कमी वेळात वसईमधून…
..तर एस टी कामगारांच्या असंतोषाचा उद्रेक राज ठाकरेंचे मुख्यमंत्र्यांना पत्र
मुंबई- पगारवाढ आणि राज्य सरकारच्या सेवेत एस टी चे विलीनीकरण करण्याच्या मागणीसाठी एस टी कामगारांनी जो संप पुकारला आहे तो न्यायालयाच्या आदेशानंतरही सुरूच असल्याने आता राज्य सरकार संपकरी एस टी कामगारांवर कठोर कारवाईची तयारी करीत आहे याच दरम्यान काल माणसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी मुख्यमंत्री उद्वव ठाकरे यांना पत्र लिहून एस टी कामगारांवर कोणतीही कठोर…
कोरोनामुक्तीसाठी गणेशोत्सवातून जनजागृती
परिवाराने ठाण्यात साबण आणि मास्क चा केला सजावटीत पुरेपूर वापर मुंबई, दि. 11 (प्रतिनिधी) : कोरोनामुक्तीसाठी गणेशोत्सवातून जनजागृती करण्याचा प्रयत्न सार्वजनिक गणेशोत्सव मंडळे करीत असतांनाच घरगुती गणेशोत्सवाच्या माध्यमातून सुद्धा कोरोनामुक्तीसाठी जनजागृती करण्यात येत आहे. ठाणे येथील पाचपाखाडी विभागात वास्तव्य करणाऱ्या साहित्यिक शुभांगी जयंत लेले यांच्या परिवारातर्फेही यंदा कोरोनामुक्तीसाठी गणेशोत्सवात सजावट करुन जनतेला उत्तम संदेश दिला…
भिवंडी शहरातील छत्रपती शिवाजी महाराज चौकातील रेसिडेन्सी मध्ये राहणाऱ्या भिवंडी पश्चिमच्या तनिष्का आमदार रोमा निलेश आळशी यांच्या घरी सहा वर्षांनी फिरत्या गौरीचे आगमन…
भिवंडी (प्रतिनिधी )भिवंडी पश्चिमच्या तनिष्का आमदार रोमा निलेश आळशी यांच्या घरी फिरत्या गौरी चे आगमन तब्बल सहा वर्ष्यानी झाले असून समाजसेवक निलेश आळशी यांच्या शहरातील छत्रपती शिवाजी महाराज चौकातील रेसिडेन्सी मध्ये असलेल्या निवास्थानी सोमवारी सामाजिक कार्यकर्ते, राजकीय नेते आणि महिलांनी गौरी दर्शनासाठी मोठी गर्दी केली होती कारण आळशी परिवारामध्ये फिरती गौरी यांना जास्त महत्व असून कुटुंबातील सर्व सदस्या कडे प्रत्येक वर्षी…
भाई जगताप यांची उचलबांगडी -मुंबई काँग्रेसच्या अध्यक्षपदी वर्ष गायकवाड
मुंबई/ मुंबई महापालिकेची निवडणूक आता कधीही होऊ शकते या पार्श्वभूमीवर भाजपने मुंबई महापालिका जिंकण्यासाठी जोरदार तयारी केली आहे तर भाजपला रोखण्यासाठी काँग्रेसने दलीत कार्ड खेळले आहे.महापालिका निवडणुकीच्या तोंडावरच काँग्रेसने मुंबई प्रदेश काँग्रेसच्या अध्यक्षपदावर दलित महिलेची नियुक्ती केली आहे. त्यासाठी मुंबई काँग्रेसच्या अध्यक्ष पदावरून भाई जगताप यांची उचलबांगडी करुंन त्यांच्या जागी वर्ष गायकवाड यांची नियुक्ती केली…
