कणकवली/ अधिवेशन काळात विधान भवनाच्या पायऱ्यांवर बसून आदित्य ठाकरेंकडे पाहून मयव म्यव करणाऱ्या आमदार नितेश राणे यांना सत्ताधारी पक्षाने निलंबित करण्यासाठी कंबर कसली आहे तर दुसरीकडे शिवसेना कार्यकर्ते सतिश परब यांनी झालेल्या मारहाणच्या प्रकरणी नितेश राणेंचे नाव आल्याने व त्यांच्या विरुद्ध गुन्हा दाखल झाल्याने त्यांच्यावर अटकेची टांगती तलवार आहे.या प्रकरणी नितेश राणे यांनी सिंधुदुर्ग जिल्हा न्यायालयात अटकपूर्व जामिनासाठी धाव घेतली आहेे. मात्र काल सुनावणी पूर्ण होऊ शकली नाही त्यामुळे आज नितेश राणे यांचा अटकपूर्व जामीन मंजूर होतो की त्यांना अटक होणार याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे मात्र दोन्हीकडून वकिलांची फौज उभी आहे नितेश राणे यांच्याकडून ad. संग्राम देसाई आणि त्यांचे पाच सहकारी तर सरकारी पक्षाकडून ad. घरत आणि त्यांचे सहकारी न्यायालयात युक्तिवाद करत आहेत शिवसेना कार्यकर्ते सतीश परब मोटारसायकल वरून जात असताना त्यांच्या मागून आलेल्या करणे त्यांना धडक देऊन खाली पडले त्यानंतर कारमधून उतरलेले गोत्ये आणि त्याच्या साथीदारांनी तू सतीश सावंत साठी काम करतोस का असे विचारून त्याच्यावर हल्ला केला होता यात परब जखमी झाला होताा. या हल्ल्यानंतर हल्लेखोरांनी नितेशला कळवा काम झाले असे शब्द उच्चारले होते त्यामुळे या प्रकरणात नितेश राणे अडकले आहेत.
Similar Posts
न्यू सातारा समूहातर्फे भव्य हरिनाम सप्ताह: नामांकित कीर्तनकारांच्या कीर्तनसेवा
मुंबई: न्यू सातारा समूहातर्फे भव्य हरिनाम सप्ताह आयोजित करण्यात आला असून, यामध्ये महाराष्ट्रातील नामांकित कीर्तनकारांच्या संकीर्तन सेवांचा समावेश आहे. हा सप्ताह शुक्रवार ३ एप्रिल २०२६ पासून गुरुवार ९ एप्रिल २०२६ पर्यंत होणार आहे. गिरणगाव परिसरातील सर्व वारकरी बंधू-भगिनींनी श्रवण सुखाचा लाभ घ्यावा, असे आवाहन न्यू सातारा जिल्हा नागरिक मल्टीस्टेट मल्टीपर्पज को-ऑपरेटिव्ह सोसायटीमार्फत करण्यात आले आहे.कीर्तनकारांची…
युनियनचां आदेश संपकरी एस टी कर्मचाऱ्यांनी धुडकावला संप सुरूच
मुंबई/ कनिष्ठ वेतन श्रेणी एस टी कर्मचारी संघटनेचे नेते गुजर यांनी सरकारशी वाटाघाटी करून टी कामगारांचा संप मागे घेण्याची जिघोषणा केली होती ती संपकरी कर्मचाऱ्यांनी धुडकावली असून एस टी चा संप सुरूच राहणार आहे.सोमवारी उच्च न्यायालयात सरकारणे स्थापन केलेल्या समितीने प्रार्थमिक अहवाल सादर केला. त्यात विलीनीकरण करण्याच्या मुद्द्यावर अभ्यास करायला वेळ देण्याची मागणी केली होती…
मराठा आरक्षणासाठी पुन्हा जरांगेचे उपोषण -मुख्यमंत्री – उप मुख्यमंत्री तातडीने दिल्लीला
मुंबई- मराठा आरक्षणाबाबत मुख्यमंत्र्यांनी दसरा मेळाव्यात आश्वासन दिले होते पण त्यानंतरही मराठा नेते मनोज जरांगे पाटील आजपासून उपोषणाला बसले आहेत. मराठा समाज आता आरक्षणासाठी आक्रमक होताना दिसत आहे. मनोज जरांगे उपोषण मागे घेण्यास तयार नाहीत. त्यांना आज सकाळी मंत्री गिरीश महाजन यांनी फोन करुन उपोषण मागे घेण्याची विनंती केली. पण मनोज जरांगे आपल्या भूमिकेवर ठाम…
एस टी कामगारांचे विलीनीकरण होणार नाही- अजितदादा
मुंबई/ सध्या संपूर्ण महाराष्ट्रात शासनात विलीनीकरण करण्याच्या मागणीसाठी जो संप सुरू आहे त्या संपकऱ्याना काल दोन मोठे धक्के बसले पहिला म्हणजे बडतर्फी रोखण्यासाठी न्यायालयात जी याचिका दाखल करण्यात आली होती ती न्यायालयाने फेटाळली त्यामुळे संपकरी कामगारांना बडतर्फ करण्याचा मार्ग मोकळा झाला आहे तर दुसरीकडे उप मुख्यमंत्री अजित पवार यांनी काल विधानसभेत सांगून टाकले की एस…
सेना भाजपच्या युतीसाठी – मुख्यमंत्री अनुकूल – आजी माजी आणि भविष्यात एकत्र आले तर भावी सहकारी… उद्वव ठाकरे
औरंगाबाद/राजस्थानात कधीही न घडणाऱ्या घटनांमुळे पुन्हा एकदा महाराष्ट्रातील विवादीत पक्षात पुन्हा एकदा मनोमन परिस्थिती निर्माण झाली आहे. युतीसाठी मुख्यमंत्री अनुकूल आहे पण महाविकास काय?.काल मराठवाडा मुक्ताफळ निसर्ग आणि राजाबाद मध्ये सर्वस्वी कार्यक्रमात रावसाहेब दानवे आणि उध्दव ठाकरे एकाच वेळी एकत्र आले होते. मुख्यमंत्र्यांनी मला मुंबईला निश्चय केला आहे की, आपण पुन्हा एकदा चर्चा करूया, असे…
तुमच्या सरदाराने सत्तेच्या जाळ्यात उड्या टाकल्या होत्या ना… मंत्रालयात लावलेल्या जाळ्यात उड्या टाकणाऱ्या अजित पवार गटाच्या आमदारांना राज ठाकरेंचा टोला
मुंबई/धनगर समाजाचा एसटी प्रवर्गात समावेश करू नये तसेच पेसा अंतर्गत भरती करण्याच्या मागणीसाठी अजित पवार गटाच्या काही आमदारांनी आज मंत्रालयातील लावलेल्या सुरक्षा जाळ्यांवर उतरून आंदोलन केले यामध्ये विधानसभेचे उपाध्यक्ष नरहरी शिरवळ आमदार डॉक्टर किरण लहाने काशीराम पावरा हिरामण भोसकर राजेश पाटील आणि खासदार हेमंत सावरा यांचा समावेश होता त्यांचे हे आंदोलन मंत्रालयात खळबळ उडवून देणारे…
