[bdp_ticker ticker_title="ताज्या बातम्या" theme_color="#e41215" font_style="bold" ticker_effect="slide-h"]
संपादक: किसन जाधव
ताज्या बातम्या

ठाकरे पिता पुत्र , अनिल परब व अजित पवारांना अडकवण्यासाठी तत्कालीन गृहमंत्री अनिल देशमुख यांच्यावर फडणवीसांचा दबाव – शाम मानव यांचा खळबळजनक गौप्य्स्फोट

मुंबई – अंधश्रद्धा निर्मुलन समितीचे श्याम मानव यांनी, सनसनाटी दावे करुन खळबळ उडवली. महाविकास आघाडी सरकारमध्ये, फडणवीसांद्वारे तत्कालीन गृहमंत्री अनिल देशमुखांकडे 4 प्रतिज्ञापत्रांवर सही करुन देण्यास सांगितलं. ज्याद्वारे उद्धव ठाकरे, आदित्य ठाकरे, अनिल परब आणि अजित पवार अडकतील. त्यामोबदल्यात तुम्हाला जेलमध्ये जावं लागणार नाही, यासाठी अनिल देशमुखांवर दबाव टाकल्याचं श्याम मानव म्हणाले आहेत.
ठाकरेंच्या मुलानं दिशा सालियावर बलात्कार करुन खून केला.
अनिल परबांच्या अवैध बांधकामांच्या प्रतिज्ञापत्रावर सही करा.
अजित पवारांनी गुटखावाल्यांकडून पैसे घेण्यास सांगितलं.
सुपारी घेवून बोलणाऱ्यांच्या नादी श्याम मानव लागलेत अशी टीका देवेंद्र फडणवीस यांनी केली.

उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी श्याम मानव यांच्या आरोपांवर उत्तर दिले आहे. ‘श्याम मानव इतक्या वर्षांपासून मला ओळखतात. त्यांनी आरोप करण्याआधी मला विचारायला हवं होतं. आता इको सिस्टममध्ये सुपारीबाज लोकं घुसले आहेत. दुर्दैवाने श्याम मानव त्यांच्या नादी लागले का? अनिल देशमुख यांच्यावर आरोप लागले तेव्हा महाविकासआघाडीचं सरकार होतं. ती केस मुंबई हायकोर्टाच्या चीफ जस्टीस यांच्या समोर लागल्यानंतर त्यांनी एफआयआर दाखल करायला लावला. त्यानंतर ते जेलमध्ये गेले. ते काय सुटले नाहीत. ते जामिनावर बाहेर आहेत. ते सुटलेले नाहीयेत. १०० कोटीच्या वसुली केसमध्ये ते बेलवर बाहेर आहेत. ते सातत्याने आरोप करताय मी शांत आहे. मी अशा प्रकारे राजकारण करत नाही. मी कोणाच्या नादी लागत नाही. कोणी नादी लागलं तर सोडत नाही.’
त्याचवेळी मविआच्या काळातील ऑडिओ व्हिडीओ क्लीप, समोर आणण्याचा इशारा दिला. श्याम मानवांनी फडणवीसांवर गंभीर आरोप केल्यानंतर, तत्कालीन गृहमंत्री अनिल देशमुखांनी हे आरोप सत्य असल्याचं म्हटलं आहे.

error: Content is protected !!