ज्येष्ठ पत्रकार नारायण जाधव काळाच्या पडद्याआड
मुंबई, (प्रतिनिधी)- हातातली लेखणी थांबली, पण त्यांनी लिहिलेली बातमी मात्र त्यांच्या निधनानंतरही वाचकांपर्यंत पोहोचली. मृत्यूने शरीर हिरावून घेतले, पण पत्रकारितेचे व्रत अखेरच्या श्वासापर्यंत जपणाऱ्या ज्येष्ठ पत्रकार नारायण जाधव यांच्या आयुष्याचा हा विलक्षण आणि तितकाच हृदयस्पर्शी शेवट आहे. दैनिक ‘सामना’चे माजी वरिष्ठ उपसंपादक नारायण जाधव यांचे बुधवारी रात्री हृदयविकाराच्या तीव्र झटक्याने निधन झाले. त्यांच्या निधनानंतरही गुरुवारी…
