देशासाठी सोने जिंकले; राज्याच्या पुरस्कारात मात्र ‘कबड्डी’चा हिशोब!
हरयाणा-उत्तर प्रदेशच्या खेळाडूंवर तीन कोटींचा वर्षाव; महाराष्ट्राच्या सुवर्णविजेत्यांच्या वाट्याला अवघे ४२ लाख एकाच संघात, एकाच सुवर्णासाठी एवढी तफावत का? मुंबई, – देशासाठी एकच सुवर्णपदक… मैदान एकच… प्रतिस्पर्धी एकच… संघही एकच. पण पदक जिंकल्यानंतर पुरस्काराची वेळ येताच महाराष्ट्राच्या खेळाडूंसाठी मात्र ‘कबड्डीचा हिशोब’ सुरू होतो. हरयाणा आणि उत्तर प्रदेशच्या सुवर्णविजेत्या कबड्डीपटूंना तीन-तीन कोटी रुपयांचा रोख सन्मान मिळत…
