३० दिवसात हजर झाले नाही तर संपत्ती जप्त करणार- परमवीर सिंग फरार घोषित
मुंबई/ १०० कोटींच्या खंडणी प्रकरणात गेल्या अनेक दिवसांपासून तपास यंत्रणांना वॉन्टेड असलेले मुंबईचे माजी पोलीस आयुक्त परमवीर सिंग यांना काल न्यायालयाने फरार घोषित केले.आता ३० दिवसांच्या आत जर ते हजार झाले नाहीत तर त्यांची मुंबई आणि चंदीगड येथील सर्व संपत्ती जप्त होणार आहे.१०० कोटींच्या खंडणी प्रकरणात तसेच ठाण्यातील एका बांधकाम व्यावसायिकाला धमकावून खंडणी उकळण्याचा परमवीर…
