सायकल पार्किंगसाठी १५ लाखांचा दंड ठोठावणाऱ्या गृहनिर्माण संस्थेला मुंबई उच्च न्यायालयाचा मोठा दणका
मुंबई:इमारतीच्या जिन्याखालील मोकळ्या जागेत सायकल पार्क केल्याप्रकरणी एका गृहनिर्माण संस्थेने फ्लॅटधारकाला तब्बल १५ लाख ४५ हजार ७३० रुपयांचा दणकेबाज दंड ठोठावल्याचा अजब प्रकार मुंबईत उघडकीस आला आहे. या प्रकरणी मुंबई उच्च न्यायालयाने सोसायटीच्या मनमानी कारभारावर कडक शब्दांत ताशेरे ओढत हा अन्यायी निर्णय रद्द केला आणि संबंधित सभासदांना मोठा दिलासा दिला.मुंबईतील धनलक्ष्मी को-ऑपरेटिव्ह हौसिंग सोसायटीतील योगिनी…
