बांग्लादेशच्या पंतप्रधान शेख हसीना यांनी सांप्रदायिक हल्ले करणाऱ्यांविरोधात कडक कारवाई करण्याचे आदेश देवूनही हिंदू मंदिरांवर हल्ले सुरुच
ढाका: बांग्लादेशातील मंदिरांवरील हल्ले सुरुच आहेत. तीन दिवसांमध्ये दुसऱ्यांदा मंदिरांवर हल्ले झाले आहेत. बांग्लादेशच्या नौखाली जिल्ह्यात शुक्रवारी कथित समुदायानं इस्कॉन मंदिरावर हल्ला केला. या घटनेची माहिती बांग्लादेशातील इस्कॉन समुदायानं ट्विट करुन दिली आहे. गुरुवारी बांग्लादेशात दुर्गा पूजेदरम्यान हिंसाचार झाला होता. यामध्ये काही समाजकंटकांनी हल्ला करत हिंदू मंदिरात तोडफोड केली होती यानंतर देशभरात तणावाचं वातावरण निर्माण…
