“यूपीआयच्या” यशानंतर कृषी कर्जांसाठी “युएलआय”
रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाने युनिफाईड पेमेंट इंटरफेस (यूपीआय) या डिजिटल पायाभूत सुविधांमध्ये अभूतपूर्व यश मिळवल्यानंतर देशातील लाखो शेतकऱ्यांसाठी कृषी कर्जामध्ये सुलभता निर्माण व्हावी म्हणून युनिफाईड लेंडिंग इंटरफेस (युएलआय) ही नवी एकीकृत कर्ज वितरण प्रणाली सुरू केली आहे. शेतकऱ्यांच्या दृष्टिकोनातून जीवनदायी व क्रांतीकारी ठरणाऱ्या या नव्या डिजिटल सुविधेचा आढावा. रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाने सार्वजनिक डिजिटल पायाभूत…
