संघर्षाच्या भट्टीत तावून सुलाखून निघालेला आधुनिक ‘चाणक्य’ :. डॉ. मनोहर गजानन जोशी ! –
कुलाबा आणि आताच्या रायगड जिल्ह्यातील नांदवी या खेडेगावात सौ. सरस्वती आणि श्री. गजाननराव जोशी या गरीब ब्राह्मण कुटुंबात जन्माला येऊन माधुकरी मागून, वारावर जेवून, वडिलांबरोबर भिक्षुकी करुन, नोकरी करीत, ‘कमवा आणि शिका’ ही संकल्पना प्रत्यक्षात आणणारा, शिक्षणासाठी निरनिराळ्या ठिकाणी भटकत भटकत मुंबईत स्थिरस्थावर होऊन मुंबई महापालिकेच्या लिपिकाची नोकरी करणाऱ्या आणि त्याच महापालिकेच्या महापौर पदी विराजमान…
