चौदा तोळे चोरीला गेलेले, एकच तोळा कसे देताय ? तक्रारदाराचा सवाल
मुंबई: बारा वर्षांपूर्वी माझे चौदा तोळे सोने चोरीला गेले होते, आज तुम्ही एकच तोळे परत करताय, मी विचारू शकतो असे का, असा सवाल शुक्रवारी मुंबई पोलिसांचे सहपोलीस आयुक्त (कायदा आणि सुव्यवस्था) विश्वास नांगरे-पाटील यांना मालमत्ता वाटपाच्या भर कार्यक्रमात नारायण केरकर (३०) नामक तक्रारदाराने केला. त्यावर आपली एफआयआर मी वाचला असून, त्याबाबत आपली मदत पोलीस नक्कीच…
