मूळ पगारात साडेसहा हजारांची वेतनवाढ-मुख्यमंत्रयांबरोबरच्या चर्चे नंतर एसटी कामगारांचा संप मागे
मुंबई – राज्यातील एसटी कामगारांनी दोन दिवसांपासून पुकारलेल्या संपानंतर आज सह्याद्रीय अतिथी गृहावर एसटी कामगार संघटना आणि मुख्यमंत्री यांच्यात बैठक झाली. या बैठकीत चर्चे अंती राज्य सरकारने कामगारांच्या मागण्या मान्य करत एसटी कामगारांच्या पगारात घसघशीत वाढ दिली आहे. कर्मचाऱ्यांच्या मूळ पगारात साडे सहा हजाराची वाढ जाहीर करण्यात आली आहे. त्यामुळे, एसटी कर्मचारी संघटनांनी समाधान व्यक्त…
