गुजरातमध्ये भाजपचा रेकॉर्डब्रेक विजय – पण हिमाचलमधील सत्ता गेली
गांधीनगर – गुजरात विधानसभा निवडणुकीत भाजपने १५६ जागा जिंकून निर्विवाद बहुमत मिळवले आहे तर काँग्रेसला अवघ्या १७ जागा मिळाल्याने त्यांचा सुपडा साफ झाला आहे. गुजरातमध्ये सरकार बनवण्याची स्वप्ने पाहणाऱ्या आम आदमीला केवळ ५ जागा मिळाल्या . दरम्यान गुजरातमध्ये भाजपने जरी आपली सत्ता कायम राखली तरी हिमाचल प्रदेश मधील भाजपची सत्ता मात्र काँग्रेसने हिसकावून घेतली ….
