ईशान्य भारताला भूकंपाचे धक्के
गोहाटी/काही दिवसांपूर्वी अफगाणिस्तानमध्ये शक्तिशाली भूकंप झाला होता. यात शेकडो लोकांना जीव गमवावा लागला होता. अशातच आता ईशान्य भारतातही भूकंपाचे धक्के जाणवले आहेत. आसाममधील उदलगुरीसह आसपासच्या भागात ५.८ रिश्टर स्केल तीव्रतेच्या भूकंपाचे धक्के जाणवले. या भूकंपाचे केंद्र आसाममधील उदलगुरी येथे होते. तसेच या भूकंपाची खोली ५ किलोमीटर होती अशी माहितीही समोर आली आहे.राष्ट्रीय भूकंपशास्त्र केंद्राने या…
