पत्रकारांसाठी पत्रकारांनीच एकजुटीने उभे राहिले पाहिजे, कोणीही मदतीला येणार नाही – ज्येष्ठ राजकीय विश्लेषक योगेश वसंत त्रिवेदी
मुंबई, दि. (प्रतिनिधी) : आर्थिकदृष्ट्या हलाखीचे जीवन जगणाऱ्या पत्रकाराने सरकारी जाचक अटींच्या तिरडीवरुनच सरणावर जावे अशी अपेक्षा आहे काय ? विनय खरे गेले, विजय साखळकर गेले, संजीवन ढेरे आजारी आहेत, अनेक पत्रकार स्वाभिमानाने जगतांना आर्थिकदृष्ट्या हलाखीचे जीवन जगत आहेत. प्रभाकर राणे, अनंत मोरे अशी अनेक उदाहरणे आहेत. अधिस्वीकृती पत्रिकेचे जाचक नियम दाखवून सुविधा नाकारण्यात येत…
