मुंबई महापालिकेच्या स्थापत्य विभागातील दुय्यम अभियंत्यांना सहाय्यक अभियंता पदी पदोन्नती
मुंबई- मुंबई महानगरपालिकेच्या विविध प्रभागामध्ये चांगले आणि व्यवस्थित काम होण्यासाठी काम करणार्या अभियंताना त्यांच्या कामानुसार आणि नियमानुसार बढती दिली जाते. मुंबई महानगरपालिकेच्या स्थापत्य विभागातील जवळपास 105 दुय्यम अभियंत्यांना सहाय्यक अभियंता पदी पदोन्नती देण्यात आली. पदोन्नती देण्यात आलेल्या या अभियंत्यांना सातव्या वेतन आयोगाच्या शिफारशी नुसार सुधारित वेतनश्रेणी लागू होईल. पदवीधारक कोट्यातून 29/8/2024 पासून ही पदोन्नती देण्यात…
