छगन भुजबळ दंगल भडकविण्याचं काम करतायेत – मनोज जरांगे पाटील
अकोला : मराठा आरक्षणासाठी लढा देणारे मनोज जरांगे-पाटील यांची अकोला जिल्ह्यातील पातुर तालुक्यातल्या चरणगावात जाहीर सभा झाली. या जाहीर सभेत जरांगेंनी सरकारवर गंभीर आरोप केले आहेत. तसेच छगन भुजबळ यांच्यावर पुन्हा टीका केली आहे. “हा दोन जातीत दंगल भडकवायला लागलाय. मराठा ओबीसीतच आहे हे माहिती झाल्याने तो दंगल भडकावण्याचे प्रयत्न करतोय. त्याचं स्वप्नं पूर्ण होऊ…
