काश्मिरच्या चिनाब नदीवरील जगातील सर्वात उंच पुलाचे लोकार्पण
श्रीनगर/पंतप्रधान नरेंद्र मोदींनी रियासी जिल्ह्यात चिनाब नदीवरील जगातील सर्वात उंच रेल्वे आर्च ब्रिजचे तिरंगा फडकावून उद्घाटन केले. अशाप्रकारे, सुमारे १२५ वर्षांच्या संघर्षानंतर, भारतीय रेल्वे काश्मीरमध्ये पोहोचली. हा रेल्वे पूल अभियांत्रिकी जगात एक चमत्कार आहे आणि तो अस्तित्वात आल्यापासून, भारताच्या पूल अभियांत्रिकीची जगभरात प्रशंसा केली जात आहे. रियासी जिल्ह्यातील बक्कल आणि कौडी दरम्यानचा हा पूल बांधण्यासाठी…
